भुसावळातील के.नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश

तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील संघ प्रथम


भुसावळ (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : सेवा पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग, नगरपरिषद भुसावळ आणि म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुकास्तरीय शालेय मुलींच्या खो-खो व मुलांच्या हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये झाल्या. या स्पर्धेत शहरातील के.नारखेडे विद्यालयातील 17 वर्षाखालील मुलांचा संघ व्हॉलीबॉल स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम आला असून विद्यालयाच्या संघाची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.

यशस्वी खेळाडूंचा गौरव
क्रीडा शिक्षक एन.पी.नेहेते, पी.आर.सपकाळे, नवीन नेमाडे यांच्यासह खेळाडूंचे संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे , उपाध्यक्ष किशोर नारखेडे, संस्था कार्यकारिणी सदस्य भाग्येश नारखेडे, श्वेता नारखेडे, संस्थेचे चेअरमन श्रीनिवास नारखेडे, संस्था सदस्य संजीव नारखेडे, राज नारखेडे, अर्चना नारखेडे, संस्थेचे ऑनररी जॉइंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, संस्थेचे लिपिक प्रमोद तळेले, विद्यालयातील ज्येष्ठ क्लार्क मंगेश पाटील आदींनी कौतुक केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !