श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.मकरंद नारखेडे यांची बिनविरोध निवड
भुसावळ (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : शहरातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.मकरंद नारखेडे यांची पुनश्च एकदा बिनविरोध निवड करण्यात आली. शहरातील तु.स.झोपे प्राथमिक विद्या मंदिरात मंगळवारी 66 वी सर्वसाधारण सभा मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. यावेळी 2026 ते 2031 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी डॉ.मकरंद नारखेडे यांची सर्वानुमते श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.मकरंद नारखेडे, संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्था कार्यकारिणी सदस्य भाग्येश नारखेडे, संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे व इतर मान्यवर सदस्यांची उपस्थिती होती.
निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
याप्रसंगी के. नारखेडे कम्प्युटर टेक्नॉलॉजी संस्था व व परीक्षा समिती विभाग प्रमुख बी.ए.पाटील व संस्थेचे लिपिक प्रमोद तळेले यांनी डॉ. मकरंद नारखेडे यांना निवडीनंतर शुभेच्छा दिल्या.
के.नारखेडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, विद्यालयाचे हेड क्लर्क मंगेश पाटील, ग्रंथपाल व्ही.टी.भंगाळे त्याचप्रमाणे एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, सायन्स कॉलेजचे प्रिन्सिपल अभय श्रीवास, तु.स.झोपे विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सुनील वानखेडे, इंग्लिश मीडियम स्कूल दीपनगरच्या प्रिन्सिपल धनश्री भारंबे, पूर्व प्राथमिक (हंबर्डीकर) विद्यामंदिर व शिशुविहार भुसावळातील सुपरवायझर निलिमा राणे, प्रत्येक भगिनी शाखेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी डॉ.मकरंद नारखेडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.




