यावल पोलीस ठाण्यातील बाप्पाला भावपूर्ण निरोप
यावल (शनिवार, 26 सप्टेंबर 2026) : पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी बांधवांच्या वतीने श्रींची स्थापना करण्यात आली होती. यंदाचे हे तिसरे वर्ष होते व शनिवारी मोठ्या उत्साहात बाप्पांना निरोप देण्यात आला. पोलीस ठाण्यापासून ते भुसावळ टी पॉईंटपर्यंत पारंपारिक वाद्य वृंदात मिरवणूक काढण्यात आली. श्रींचे विसर्जन झाल्यानंतर पोलीस ठाण्यात महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले.
यंदा उत्सवाचे तिसरे वर्ष
यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी बांधवांनी श्रींची स्थापना केली. यंदाचे हे तिसरे वर्ष होते. पारंपरिक पद्धतीने सकाळ, सायंकाळ या ठिकाणी आरती करण्यात आली. शनिवारी मोठ्या उत्साहात बाप्पांना निरोप देण्यात आला. पोलीस अधिकारी, कर्मचारी बांधवांनी पारंपारिक वाद्य वृंदाच्या गजरात पोलीस ठाण्यापासून ते अंकलेश्वर बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भुसावळ टी पॉईंटपर्यंत मिरवणूक काढली. एका सजवलेल्या वाहनातून श्रींचे तापी नदी पात्रात विसर्जन करण्यात आले. त्यानंतर यावल पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस वसाहतीत महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात फैजपूरची डीवायएसपी अनिल बडगुजर, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी देखील उपस्थिती दिली.
पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक मैनौद्दीन सय्यद, पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेखसह सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, होमगार्ड बांधवांनी परिश्रम घेतले.