भुसावळातील विविध गणेश मंडळात गणपती अथर्वशीर्ष वाचन


भुसावळ (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : गणेशोत्सव काळात येणार्‍या पिढीला आपल्या संस्कृतीची आठवण राहावी तसेच आपली संस्कृती जपावी या उद्देशाने लहान बाळ गोपाळ, महिला, तरुण-तरुणींकडून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सारिका राजपूत यांनी विविध गणेश मंडळात जाऊन आपल्या सदस्यांतर्फे गणपती अथर्वशीर्ष वाचन मंडळातील कार्यकर्ते महिलांच्या मदतीने पूर्ण करून घेतले

स्मरणशक्तीत होते वाढ
गणपती अथर्वशीर्ष पठणामुळे आयुष्यातील आणि कामातील सर्व विघ्ने व संकटं दूर होतात, मानसिक शांती व आत्मविश्वास: मनातील नकारात्मकता नाहीशी होते, मन स्थिर राहते आणि आत्मविश्वास वाढतो शिवाय विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आणि बुद्धी तीव्र होते; शिक्षणातील सर्व अडचणी दूर होतात व नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होऊन स्थिर संपत्ती व ऐश्वर्य प्राप्त होते, नकारात्मक ऊर्जा नाशास मदत होते, अशी धार्मिक मान्यता आहे

यांची होती उपस्थिती
प्रसंगी वाचन करण्यासाठी सुनीता पाटील, जयश्री पाटील, कविता पाटील, आशा पाटील, कोकिळा पाटील, प्रतीक्षा पाटील, प्रमिला पाटील, सविता पाटील, गायत्री पाटील, प्रियंका बोरसे, सपना पाटील, प्रियंका पाटील, श्रद्धा पाटील, अर्चना पाटील, उज्वला पाटील, मोहिनी पाटील, अनिता पाटील, स्मिता पाटील, सविता मोरे, दीपाली तेली, दीपाली चौधरी, नेहा जावरे, योगीता खरात, सुनीता कनोजिया, सोनाली बनसोडे, शीतल भोळे आदींचे सहकार्य लाभले. या धार्मिक कार्यात जय कपिलेश्वर गणेश मंडळ, रामराज्य गणेश मंडळ, विघ्नहर्ता बाळ गोपाळ मंडळ, लेवा पाटीदार गणेश मंडळाचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !