जिल्हास्तरीय ओपन साईट रायफल शूटिंग स्पर्धेत मिलिंद बोरसे प्रथम
सांगवी बुद्रुक, ता.यावल (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : ज्योती विद्या मंदिर तथा ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी बुद्रुक येथील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी मिलिंद प्रशांत बोरसे याने जिल्हास्तरीय ओपन साईड रायफल शूटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन मिळवले.
मिलिंदने आपल्या अचूक नेमबाजीचे कौशल्य दाखवत ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मिलिंदच्या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
