दिवाळी, पूजा आणि छठ सणासाठी मध्य रेल्वेची विशेष भेट ! अमरावती-उधना दरम्यान विशेष गाड्या धावणार !


भुसावळ (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : पूजा, दिवाळी आणि छठ सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने अमरावती ते उधना दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता यावा आणि नियमित गाड्यांवरील अतिरिक्त गर्दीचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने या विशेष गाड्यांचे संचालन करण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे विदर्भ, खान्देश आणि गुजरातकडे जाणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

अमरावती-उधना विशेष गाडीच्या 12 फेर्‍या
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 09014 अमरावती-उधना साप्ताहिक विशेष ही 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर सोमवारी अमरावती येथून रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसर्‍या दिवशी, मंगळवारी सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी उधना येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 09013 उधना-अमरावती साप्ताहिक विशेष ही 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर सोमवारी उधना येथून सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी अमरावती येथे पोहोचेल.

भुसावळ, जळगावसह अनेक स्थानकांवर थांबे
या विशेष गाड्यांना मार्गावरील विविध महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामध्ये बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, सिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, नवापूर आणि व्यारा या स्थानकांचा समावेश आहे.

या थांब्यांमुळे विदर्भ, खान्देश आणि गुजरातमधील प्रवाशांना सणासुदीच्या काळात प्रवासासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः भुसावळ आणि जळगाव परिसरातील प्रवाशांना या गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.

गाडीची कोच संरचना
या विशेष रेल्वे गाडीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारचे डबे उपलब्ध असतील. त्यामध्ये एक वातानुकूलित चेअर कार, चार चेअर कार, दोन शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि गार्ड्स ब्रेक व्हॅनसह द्वितीय आसनाचा एक डबा समाविष्ट आहे.

रेल्वे आरक्षणासाठी रेलवन अ‍ॅपचा वापर करा
प्रवाशांना या विशेष गाड्यांचे तिकीट आरक्षण करण्यासाठी रेलवन पचा वापर करता येईल. तसेच, गाड्यांच्या विविध स्थानकांवरील आगमन आणि प्रस्थानाच्या सविस्तर वेळा जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे चौकशी प्रणाली (छढएड), भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा अ‍ॅप डाउनलोड करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन सुरू करण्यात येणार्‍या या विशेष गाड्यांमुळे प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोयीचे होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !