भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत पोक्सो कायद्यावर मार्गदर्शन
भुसावळ (गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनांतर्गत ‘सुरक्षित बचपन’ अभियानांतर्गत मुलांकरिता मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, प्रमुख अतिथी सहदिवाणी न्यायाधीश ए.एम.कुलकर्णी, अॅड.प्रिया अडकमोल, स्वाती भोळे, भाऊसाहेब गणेश निंबोळकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, जेष्ठ पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी. जोगी, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील उपस्थित होते.
गुड व बॅच टचबाबत मार्गदर्शन
याप्रसंगी न्यायाधीश ए.एम.कुलकर्णी, अॅड.प्रिया अडकमोल यांनी मुलांना ‘गुड टच ,बॅड टच’, पोक्सो कायदा यासंबंधी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक एस.एल.राणे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मनीषा सोनवणे यांनी केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.