जळगावात अनैतिक संबंधाच्या संशयातून लोणावळ्यातील प्रौढाचा खून : एमआयडीसी पोलिसांकडून आरोपीला अटक


जळगाव (सोमवार, 9 नोव्हेंबर 2026) : अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात धरून झालेल्या वादातून लोणावळा, पुणे येथील 45 वर्षीय प्रौढाची फावडा व लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिरसोली येथे सोमवार, 9 रोजी घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्रे फिरवत संशयित आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली. मुकुंदा प्रल्हाद पाटील (42, रा. शिरसोली) असे अटकेतील आरोपीचे तर गोरख विठ्ठल ठाकूर (55, रा. शिरसोली, ता.जि.जळगाव, मूळ रा.कारके वस्ती, लोणावळा, पुणे) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

उपचारादरम्यान जखमी व्यक्तीचा मृत्यू
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख विठ्ठल ठाकूर (वय 55, रा. शिरसोली, ता. जि. जळगाव, मूळ रा. कारके वस्ती, लोणावळा, पुणे) यांचा शिरसोली गावातील मुकुंदा प्रल्हाद पाटील यांच्याशी सोमवारी वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत ठाकूर हे गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.









अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तपास पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी मुकुंदा पाटील हा मोबाईल फोन बंद करून पसार झाल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध घेण्यात आला. अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने लाकडी दांडक्याने मारहाण करून गोविंद ठाकूर यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी मुकुंदा प्रल्हाद पाटील याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवर्रेें अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेडेड उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, हवालदार प्रमोद लाडवंजारी, हवालदार किरण चौधरी, हवालदार गिरीश पाटील, हवालदार धनराज गुळवे, कॉन्स्टेबल विशाल कोळी, कॉन्स्टेबल राहुल घेटे, कॉन्स्टेबल किरण पाटील, कॉन्स्टेबल गणेश ठाकरे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !