भुसावळातील कोरोना नियंत्रणाला प्रथम प्राधान्य


नूतन मुख्याधिकारी रमाकांत डाके : पदभार स्वीकारला : विरोधकांनी केले स्वागत

भुसावळ : पालिकेच्या मुख्याधिकारीपदी कामठी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली करण्यात आल्यानंतर बुधवारी त्यांनी पदभार स्वीकारला. शहरातील कोरोना नियंत्रणावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक उल्हास पगारे, आशिक खान शेरखान, दुर्गेश ठाकुर, राहुल बोरसे, साजीद शेख, सिकंदर खान, तम्मा पहलेवान आदींनी त्यांचे स्वागत केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !