नगरसेवकांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरात वृक्षारोपण


मुक्ताईनगर : शहरातील स्वच्छ भारत सुंदर भारत टीमतर्फे नगरसेवक ललित महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधू 15 फुटी पिंपळ वृक्ष लाववून वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक निलेश साळुंखे यांची उपस्थिती होती. वंदे मातरम ग्रुपचे अध्यक्ष धनंजय सापधरे, स्वच्छ भारत सुंदर भारत टीमचे अध्यक्ष प्रदीप सोनार व सदस्य निलेश धनगर, गोपाळ भंडारे, कृष्णदेवराय सोनार, ज्ञानेश्वर पाथरवट, ज्ञानेश्वर सोनार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्वच्छता विषयक माहिती देवून करण्यात आली. प्रसंगी सर्वांनी स्वच्छतेचा संकल्प केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !