स्व.हरीभाऊं जावळेंच्या निधनाने भाजपाची अपरीमीत हानी
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : जावळे कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट
यावल : स्व.हरीभाऊ जावळे यांच्या निधनामुळे पक्षाची मोठी हानी झाली असून हरीभाऊंनी लोकसभेत व विधानसभेत शेतकर्यांचे केळीचे अनेक प्रश्न मांडले व ते नेहमी शेतकर्यांच्या हितासाठी शासनाशी भांडत असत, अशी आठवण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी सांगितली. माजी खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांच्या निधनानंतर भालोद, ता.यावल येथील मूळ गावी फडणवीस व सहकार्यांनी जावळे यांच्या कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी फडवणीस यांना शेळगाव बरेजला स्व.हरीभाऊंचे नाव द्यावे, अशा आशयाचे निवेदन दिले.
यांची होती उपस्थिती
फडणवीस यांच्यासोबत जयकुमार रावल, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गुरुमुख जगवाणी तसेच स्व.जावळे यांच्या आई सुमनबाई जावळे, पत्नी कल्पना जावळे, मुलगा अमोल जावळे, भाऊ अनिल जावळे आदी उपस्थित होत. यावेळी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुंवर, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण चौधरी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी चेअरमन दिलीप हरी चौधरी, दूध सोसायटी चेअरमन संजय ढाके, उपसरपंच जाबीर खान, समशेर खान, वि.का.सोसायटी चेअरमन मनोज जावळे, डॉ.कुंदन फेगडे आदी उपस्थित होते.

