रावेरमध्ये सात दिवसांचा जनता कर्फ्यूला प्रशासनाची मंजुरी
नगराध्यक्षांसह नगरसेवकांची तहसीलदारांकडे केली होती मागणी
रावेर : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग वाढत असल्याने 13 जुलैपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी प्रशासनाकडे केल्यानंतर तहसीलदारांनी त्यास मान्यता दिली आहे.
कोरोना संक्रमणाची साखळी तुटणार !
तालुक्यात कोरोनाचा हाहाःकार सुरू असून शहरातदेखील रुग्णांची संख्या वाढत आहे. अन्य शहरांमध्ये जनता कर्फ्यू लावण्यात आला त्याच प्रकारे रावेर शहरात सुध्दा 13 जुलैपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात यावा, अशी मागणी बुधवारी रावेरातील लोकप्रतिनिधींनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर नगराध्यक्ष दारा मोहंमद व उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्यासह नगरसेवक आसीफ मोहंमद दारा मोहंमद, सूरज चौधरी, शेख सादीक अब्दुल नबी, असदुल्लाखा मेहबूबखा, शारदाबाई चौधरी, पार्वताबाई गणपत शिंदे, संगीता भास्कर महाजन, यशवंत दलाल, संगीता वाणी, हमीदाबी अय्यूबखा पठाण, ललिता बर्वे, शेख नुसरत यास्मीन कलीम, रंजना योगेश गजरे आणि संगीता अग्रवाल यांच्या स्वाक्षर्या आहेत. याप्रसंगी मुख्याधिकारी रवींद्र लांडे व सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांची उपस्थिती होती. दरम्यान, या निवेदनाबाबत तहसीलदारांनी सकारात्मक निर्णय घेतला असल्याने आता रावेरात 13 जुलैपासून जनता कर्फ्यू लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

