सावदा शहरात 11 जुलैपासून तीन दिवस जनता कर्फ्यू
सावदा : शहरात कोरोनााबधीतांची वाढती संख्या पाहता कोरोना संक्रमणाच ी साखळी तोडण्यासाठी 11 जुलैपासून तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. या संदर्भात विश्रामगृहावर सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, संघटना, नागरीक यांची बैठक झाली व त्यात हा निर्णय घेण्यात आला.
11 ते 13 दरम्यान शहर कडकडीत बंद
शहरात कोरोनाने कहर केला असून कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी 11 ते 13 दरम्यान शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात दवाखाने, औषध दुकाने, दुध डेअरी सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे तसेच अन्य दुकाने मात्र बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, 14 जुलैपासून शहरातील सर्व भाजीपाला, फळ विक्रेते, रस्त्यावरील दुकाने आठवडे बाजारातील ओट्यांवर सोशल डिस्टन्स पाळून लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात निवेदन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, मुख्याधिकारी सौरभ जोशी,सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
बैठकीला बाजार समिती संचालक पंकज येवले, जिल्हा दूध संचालक जगदीश बढे, भाजप शहराध्यक्ष पराग पाटील, शिवसेना शहर प्रमुख मिलिंद पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कुशल जवळे, शुभम वानखेडे, तेजस वंजारी, शरद भारंबे, इलियास टेलर, अरबाज खान, नजीर भाई, विजय पाटील, शरद कस्तुरे, पिंटू धांडे, सतीश बेंडाळे, किशोर जैन, विजय कानडे, रेवा पाटील, नितीन महाजन, स्वप्नील महाजन, गणेश पाटील, सुहास भंगाळे, गजानन पाटील, रुपेश जैन, रुपेश धांडे, प्रकाश नेमाडे, यशवंत वाघुळदे, विकास पाटील, शेख सलीम, प्रमोद चौधरी, अभय निमगले, कमलाकर पाटील, सर्व पक्षीय पदाधिकारी, पत्रकार व नागरीक आदी उपस्थित होते.

