जिल्हावासीयांना दिलासा : राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र वरणगावातच
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश : केंद्र पळवल्यावरून जिल्ह्यात तापले होते वातावरण
जळगाव : जामखेड मतदारसंघात भुसावळ तालुक्यातील हतनूर-वरणगाव येथील राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण पळवण्यात आल्यानंतर जिल्ह्यात राजकारण तापले होते तर सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरीदेखील झडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करून उच्चस्तरीय पोलिस अधिकार्यांची बैठक घेण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे आता हे प्रशिक्षण केंद्र हतनूर-वरणगाव येथेच होणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

