जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 309 रुग्णांचा मृत्यू


आतापर्यंत 5302 रुग्णांना बाधा : 3079 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या सातत्याने वाढत असून प्रशासन व नागरीकांची चिंता वाढली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले असलेतरी रुग्णांची सातत्याने संख्या वाढतच असून गुरुवारी देखील 292 रुग्ण पॉझीटीव्ह आल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्ब्ल पाच हजार 302 वर पोहोचली आहे तर त्यातील तीन हजार 79 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात 309 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गुरुवारअखेर 309 रुग्णांचे मृत्यू ओढवले असून गुरुवारी (गेल्या 24 तासात) तब्बल आठ रुग्णांचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात चार तर डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये चौघा रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. मृतांमध्ये जळगाव शहरातील 56 वर्षीय पुरूषासह 58 वर्षीय महिला, जामनेर तालुक्यातील 58 व 70 वर्षीय पुरूष, चाळीसगाव तालुक्यातील 45 वर्षीय महिला, पाचोरा तालुक्यातील 60 वर्षीय पुरूष, रावेर तालुक्यातील 54 वर्षीय महिला व पारोळा तालुक्यातील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !