फॅक्टरी बंद पडल्याच्या नैराश्यातून अकोला तालुक्यातील उद्योजकाची खडक्यात आत्महत्या


भुसावळ : एमआयडीसीमधील भाडे तत्वावरील जागेवरील सुरू केलेली कंपनी बंद पडल्यानंतर आर्थिक परीस्थिती खालावल्याने तसेच आलेल्या नैराश्यातून त्यांना दारूचे व्यसन लागल्याने संतोष रामकृष्ण शिंदे (42, परसोबोडे, ता.अकोला, ह.मु.खडका) या उद्योजकाने खडका येथील राहत्या घरी आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबतची माहिती कळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, प्रेमचंद सपकाळे, विशाल खुजे, युनूस शेख, इब्राहीम शेख आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात बलराम भीमराव दहिभाते यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार शामकुमार मोरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !