भुसावळात देशी दारूची बेकायदा वाहतूक : आरोपी जाळ्यात
भुसावळ : देशी दारूची बेकायदा वाहतूक करून चोरटी विक्री करणार्या आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या ताब्यातून दोन हजार 132 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. अजय बलराम डुगलज (45, रा.कृष्णा नगर, भिरुड हॉस्पिटलच्या मागे भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
बुधवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास कृष्णा नगर, भिरुड हॉस्पिटलच्या मागे बियाणी शाळेकडे जाणार्या रस्त्यावर एक संशयीत बेकायदा देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने अजय डुगलज यास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 456 रुपये किंमतीच्या देशी दारु टंगो पंच कंपनीच्या 28 बाटल्या तसेच 676 रुपये किंमतीच्या देशी दारू टँगा पंच कंपनीच्या 26 बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, हवालदार सुनील जोशी, नाईक रवींद्र बिर्हाडे, नेव्हील बाटली, महेश चौधरी, तुषार पाटील, कृष्णा देशमुख आदींच्या पथकाने केली. तपास नाईक रवींद्र बिर्हाडे करीत आहेत.

