कुर्‍हा-मुक्ताईनगर रस्त्यावर अपघात : दुचाकीस्वार जखमी


मुक्ताईनगर : कुर्‍हा-मुक्ताईनगर रस्त्यावर अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार सुरेश राघो राऊत (55, रा.चारठाणा) हे जखमी झाले. गुरुवारी दुपारी 12 वाजता कुर्‍ह्यापासून तीन कि.मी. अंतरावर मुक्ताईनगर रस्त्यावर अशोक गोंधळी यांच्या शेताजवळ हा अपघात झााला. किराणा सामान घेवून गोंधळी हे चारठाण्याकडे निघाले असता लाल रंगाच्या अज्ञात अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिलयाने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला. भाजपचे तालुका सरचिटणीस डॉ गजानन खिरळकर, नितीन खिरळकर यांनी जखमीला आरोग्य केंद्रात दाखल केले. पोलिस नाईक संजय लाठे, संदीप खंडारे यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !