भुसावळात सहा.लोकोपायलटला लुटले : तिघांविरुद्ध गुन्हा


भुसावळ : कर्तव्यावर जात असलेल्या सहा. लोको पायलटला दुचाकीवरून आलेल्या तीन संशयितांनी पंधरा बंगला भागातील पैलवान बाबांच्या मंदिराजवळ लुटल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात रस्तालुटीचा गुन्हा दाखल झाला. लोको पायलट रामसिंग टिकाराम मीना हे मध्यरात्री कर्तव्यावर पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तीन संशयितांनी त्यांना मारहाण करीत त्यांची बॅग हिसकावून पळ काढला. बॅगेत 17 हजार रुपये किमतीचा व दीड हजारांचा असे दोन मोबाईल, एक हजार 100 रुपये रोख असा 19 हजार 600 रुपयांचा ऐवज होता.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !