धक्कादायक ! : जळगावात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार
जळगाव : आजी सोबत राहणार्या दहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ही धक्का धक्कादायक घटना शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसर्या मजल्यावर घडली. शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटलगत असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे पीडीत बालिकेला अज्ञात आरोपीने खायला देण्याच्या आमिषाने तिसर्या मजल्यावर नेत अत्याचार करीत पळ काढला. पीडीतेने याबाबत आजीला माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

