यावलमध्ये देशी-विदेशी दारूची बेकायदा वाहतूक : दोघांविरुद्ध गुन्हा
यावल : अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची दुचाकीवरून वाहतूक होत असताना पोलिसांनी संशयीतांना हटकल्यानंतर त्यांनी दुचाकी सोडून पळ काढला. पोलिसांनी संशयीतांच्या ताब्यातील 16 हजार 190 रुपयाचे दारू तसेच एक दुचाकी जप्त केली आहे. पोलिस हवालदार जगन्नाथ अशोक पाटील यांनी फिर्याद दिलयावरून संशयीत आरोपी बंडु पाटील, गणेेश शिर्के विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी रात्री बोरावल गेट भागातून आरोपी दुचाकी (एम.एच.19 टी. 2241) दारू देशी-विदेशी दारू नेत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना हटकल्यानंतर त्यांनी वाहन सोडून पळ काढला. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.

