नाल्याच्या पुरात बुडाल्याने 63 वर्षीय वयोवृद्ध शेतमजुराचा मॄत्यू
सांगवी खुर्द गावातील घटना : यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
यावल : नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडाल्याने 63 वर्षीय शेतमजुराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सांगवी खुर्द येथे गुरूवारी सकाळी उघडकीस आली. रतन दंगल सोेनवणे (63) असे मयताचे नाव आहे. रात्री शेतात पाणी भरण्यास गेले असता ही घटना घडली. पंकज रतन सोनवणेे यांच्या खबरीनुसार यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पाण्यात बुडाल्याने झाला मृत्यू
रतन सोनवणे हे बुधवारी सायंकाळी शेतकरी सुधाकर माधव कोळी यांच्या शेतात पाण्याचा व्हॉल्व्ह सुरू करण्यासाठी गेले मात्र रात्र होवूनही न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता राजोरा गावाजवळील मानपाडा नाल्यात त्यांचा चिखल मातीने भरलेला मृतदेह आढळला. रात्री झालेल्या पावसामुळे नाल्यालास पूर आल्याने व त्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख करीत आहेत.

