यावलकरांनी उत्स्फूर्तपणे पाळला बंद


स्ते ओस : व्यावसायीकांनी शंभर टक्के प्रतिष्ठाने ठेवली बंद

यावल : शहरात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या पाहता बाजारात आलेल्या नागरीकांच्या संपर्कानंतर कोरोना संसर्ग न पसरण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतर त्यास यावलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर शुकशुकाट जाणवला तर व्यावसायीकांनी आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रतिष्ठाने बंद ठेवली.

यावलमध्ये पसरली निरव शांतता
अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील बाजार समितीचे व्यापारी संकुल, शेतकी संघाचे, फ्रुट सेल सोसायटी व नगरपालिकेचे व्यापारी संकुलात शुकशुकाट दिसून आला तसेच मेन रोडवरील बुरूज चौकापासुन दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यावलकरांनीही आवाहनाला प्रतिसाद देत दिवसभर घरातच राहणे पसंत केले. यावलकरांनी पाळलेल्या बंदचे मुख्याधिकारी बबन तडवी, नगरपालिकेचे कर अधीक्षक विजय बडे, रमाकांत मोरे, शिवानंद कानडे, सुर्यकांत पाटील आदींनी व्यावसायीक व नागरीकांचे आभार मानले आहेत. दरम्यान, दर शुक्रवारी अशाच पद्धत्तीने नागरीकांनी लॉकडाऊन पाळल्यास कोरोना हद्दपार होईल, असा विश्‍वास मुख्याधिकारी बबन तडवी यांनी व्यक्त केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !