भुसावळात दोन गावठी कट्ट्यांसह आरोपी जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ : जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून गावठी कट्टे बाळगणार्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून बाजारपेठ पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश गणेश राजपूत (नारायण नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शहरातील टिंबर मार्केटजवळ आरोपी आल्यानंतर सापळा लावून असलेल्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपीला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यातून देण्यात आले आहे. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, रणजीत जाधव, अरुण राजपूत आदींच्या पथकाने केली.


