भुसावळ शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पकडला कट्टा
एका आरोपीला अटक : गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ : शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून सात नंबर पोलिस चौकीच्या मागून संशयीत आरोपी प्रीतमसिंग जितेंद्र पाटील (25, रा.गणराया विहार, भुसावळ) याच्या ताब्यातून दहा हजार रुपये किंमतीचा गावठीचा जप्त केला. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक् गजानन राठोड, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील, साहिल तडवी, संजीव पाटील, सुनील सैंदाणे, संजय बडगुजर, जितेंद्र सोनवणे, जुबेर शेख, विकास बाविस्कर, संजय ढाकणे यांनी केली. विकास बाविस्कर यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

