सावद्यात 13 रोजी उपनगराध्यक्ष निवड
सावदा : सावदा येथील विद्यमान उपनगराध्यक्षा शबाना मुराद तडवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा 6 रोजी दिल्याने रीक्त पदासाठी 13 रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे असतील. सावदा पालिकेत भाजपाची सत्ता असून आता उपनगराध्यक्ष पदासाठी कुणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागले आहे शिवाय विरोधी गटाच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. निवड बिनविरोध होते ? की निवडणूक होते हे 13 रोजीच कळणार आहे.
