यावलचे कोरोना योद्धा अरुण धनवडेंचा सहृदय सत्कार


कोरोना काळात कायदा-सुव्यवस्था राखली अबाधीत

यावल : कोरोनाविषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात अहोरात्र परीश्रम घेऊन यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी तालुक्यात शिस्तबद्ध मार्गाने कायदा-सुव्यवस्था राखण्यात लक्ष वेधणारी कामगिरी केल्याने शुक्रवारी एका वयोवृद्ध आजींनी सहृदय शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

सत्कारारूपात शबरी मातेचे दर्शन
यावल शहरातील एका 80 वर्षीय आलिशानबी शेख या शहरात त्यांचे कोणतेही नातेवाईक नसलेल्या व एकट्या राहतात. भिक्षा मागून साठविलेल्या पैशातून त्यांनी कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या कार्याला सलाम करीत शाल व पुष्पहार देऊन सहृदय गौरव केला. वयोवृद्ध महिलेने कोरोना लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कार्याच्या गौरवाने पोलिस निरीक्षक अरुण धनवडे हे भावनिक झाले व त्यांनी आज मला साक्षात प्रभू श्रीरामांची शबरी भेटली, असे उद्गार त्यांनी काढले व त्यांनी त्या वयोवृद्ध आजींचे आपल्या भावी आयुष्यासाठी व कारकिर्दीकरीता आशीर्वादही घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !