राजगृहावरील हल्ल्याची सीआयडी चौकशी करा
यावलमध्ये रीपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया गटातर्फे तहसीलदारांना निवेदन
यावल : भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा रीपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या यावल तालुका आठवले गटाच्या शाखाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व घटनेची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना देण्यात आले.
यांच्या निवेदनाद्वारे स्वाक्षर्या
निवेदनाचा आशय असा की, राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या काळात बौध्दांवर हल्ले वाढत असून तसेच मुंबई येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या घरावर काही समाजकंटकानी हल्ला करून नासधूस केली आहे. 11 जुलै 1997 रोजी घाटकोपर पुर्व येथे माता रमाबाई आंबेडकर नगरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या निरपराध आंबेडकरी अनुयायांवर बेछुट गोळीबार करण्यात आला होता व या घटनेत 11 जण शहीद झाले होते. या शहीद झालेल्यांचा स्मृतीदीन म्हणून 11 जुलै रोजी आंबेडकरी जनता पाळते व सर्व घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करीत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद आहे. यावेळी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे यावल तालुकाध्यक्ष अरुण सुपडू गजरे, तालुका उपाध्यक्ष भीमराव गजरे, राजु सुरवाडे, पंकज हिवरे व सागर गजरे उपस्थित होते.

