गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसासह आरोपीला अटक


भुसावळ बाजारपेठ, तालुका व जळगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांची संयुक्त कारवाई : खडक्यातून आवळल्या आरोपीच्या मुसक्या

भुसावळ : तालुक्यातील खडका येथून गोपनीय माहितीच्या आधारे एका युवकाकडून गावठी पिस्तुलासह चार जिवंत काडतुसे शनिवारी जप्त करण्यात आली. या प्रकरणी रोशन सपकाळे या तरुणाला अटक करण्यात आली.

संयुक्त कारवाईत आवळल्या आरोपीच्या मुसक्या
अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार रवी पाटील तसेच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे विकास सातदिवे, कमलाकर बागुल यांना खडका येथे पाठवले. या पथकाने रोशन सपकाळे याला घरातून ताब्यात घेतले. यानंतर डीवायएसपी कार्यालयात आणून त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्यात रोशनने एक गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस पोलिसांना काढून दिले. दरम्यान, महिनाभरात पोलिसांनी जप्त केलेले हे 11 वे पिस्तूल आहे. डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !