भुसावळ विभागात उद्यापासून आठ ठिकाणी आरक्षण कार्यालय सुरू होणार


भुसावळ : रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण करण्यासाठी व तिकीट रद्द करण्याकरीता सोमवार, 13 जुलैपासून भुसावळ विभागात सात ठिकाणी आरक्षण कार्यालय सकाळी आठ ते दोन दरम्यान एका शिप्टमध्ये एका खिडकीवर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुसावळ विभागात निफाड, लासलगाव, बोदवड, नांदुरा, खामगाव, मुर्तिजापूर, कारंजा व रावेर रेल्वे स्थानकावर आरक्षण कार्यालय सुरू होत असून आरक्षण धारकांनी आरक्षण कार्यालयात येताना मास्क लावून येण्यासह सोशल डिस्टन्स पाळावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !