बीग बी. नंतर ऐश्वर्या रॉयसह आराध्या बच्चनलाही कोरोनाची लागण
जया बच्चन यांना मात्र दिलासा : टेस्ट आली निगेटीव्ह
मुंबई : बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन व त्यांचा मुलगा सिने स्टार अभिषेक बच्चन यांना शनिवारी रात्री कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सिनेस्टार ऐश्वर्या रॉय बच्चनसह त्यांची कन्या आराध्या बच्चन हिलाही आता कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे तर दुसरीकडे जया बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जलसा बंगल्याचे निर्जंतुकीकरण
कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आली असलीतरी बीग बी अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चनची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. बच्चन कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्यांचा आता शोध सुरू करण्यात आला असून बच्चन यांचा जुहूमधला ’जलसा’ बंगला आता सॅनिटाईझ केला जाणार आहे.

