खंडणीखोर बोदवड पोलिसांच्या जाळ्यात


विवाहितेला ब्लॅकमेल करीत दिड लाखांची उकळली खंडणी

बोदवड : विवाहितेला ब्लॅकमेल करीत दिड लाखांची खंडणी उकळणार्‍या बहाद्दराविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. आरोपीने तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करीत त्याबाबत व्हिडिओ क्लिप तयार करून ती पतीला दाखवण्याची धमकी देत तिच्याकडून एक लाख रुपये किमतीचे दागिने व 50 हजार रुपये रोख असा एकूण दीड लाखांचा ऐवज 30 जून व तत्पूर्वी तीन महिने अगोदर घेतला होता. या प्रकरणी संशयीत आरोपी सागर शालिग्राम हिवराळे (हरणखेड) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दिल्यास पतीला मारून टाकण्याची धमकीही दिल्याने गृहिणी भेदरली मात्र शनिवारी अखेर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !