सावद्यात जनता कर्फ्यूला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावदा : शहररात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील नागरीकांनी 11 ते 13 दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला होता. गेल्या दोन दिवसांपासून शहर कडकडीत बंद असून नागरीकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, मेडिकल व दुग्ध डेअरी केवळ सुरू असून अन्य दुकाने व व्यवसाय मात्र बंद ठेवण्यात आले आहेत. एरव्ही वर्दळ असलेल्या रस्त्यांवर आता शुकशुकाट जाणवत आहे. पोलिस व पालिका प्रशासनदेखील परीस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान रस्त्यावर विनाकारण तसेच डबल सीट फिरणार्या सुमारे 40 नागरीकांवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

