धक्कादायक ! : प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेवकाने किडणीच काढली विक्रीला


भुसावळातील सत्ताधारी नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी सत्ताधार्‍यांना दिला घरचा अहेर

भुसावळ : सत्तेत राहूनही विकासकामे होत नसल्याने अशा सत्तेचा काय उपयोग? असे म्हणत सत्ताधारी भाजपावर टिकेची तोफ डागणार्‍या सत्ताधारी नरगसेवक पिंटू ठाकूर यांनी पुन्हा एकदा सत्ताधार्‍यांवर टिकेची तोफ डागली आहे. सत्तेत राहूनही प्रभागातील विकासकामे होत नसल्याने त्यांनी चक्क आता किडणीच विक्रीला काढली आली त्या माध्यमातून प्रभागाचा विकास करण्याचा निर्धार व्यक्त केल्याने भुसावळात निवडणुकीआधीच पुन्हा राजकीय आखाडा तापल्याचे चित्र आहे.

सत्तेत असतानाही विकासकामे नसल्याने संताप
भुसावळातील प्रभाग क्रमांक 20 मधील भाजपाचे नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर हे गेल्या चार वर्षांपासून प्रभागातील नागरीकांना शुध्द पाणी व रस्त्यांसाठी नगरपरीषद प्रशासन व नगराध्यक्षांशी वारंवार चर्चा, लेखी निवेदन देऊन सर्वसाधारण विषय सभेत विषय मांडत आले आहेत मात्र विकासात्मक विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आलेले नाही शिवाय नगरपरीरषदेची सभा घेण्यास प्रशासन व नगराध्यक्ष टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नगरपरीषदेच्या 2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना दिलेल्या वचननाम्यानुसार प्रभागातील कामे नगरसेवकांना करावयाची होती मात्र कामे होत नसल्याने किडणी विकून कामे करण्याचा निर्धार ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात माध्यमांना दिलेल्या पत्रात ते म्हणतात की, रस्त्यांसाठी आलेला निधी शासनाकडे परत गेला आहे. नगराध्यक्षांच्या निष्क्रियतेमुळे जनतेच्या कामांसाठी आलेला निधी परत जात आहे. नियोजनशून्य कारभार असून कुठल्याही प्रश्‍नांची दखल घेतली जात नसल्याने मी माझी किडणी विकून प्रभागातील डांबरी तसेच ट्रीमीक्स काँक्रिट रस्ते, पेव्हर ब्लॉक व शुध्द पाण्यासाठी विविध ठिकाणी आरओ प्लॅन्ट लावुन जनतेला शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या प्रभागात ही कामे जो कामे करून देईल त्या मोबदल्यात मी माझी एक किडणी देण्यास तयार असून गरजूंनी संपर्क साधावा, असे सरळ आवाहन नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी पत्रकान्वये केल्याने शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !