भुसावळातील ट्रॅामा केअर सेंटरची जिल्हाधिकार्यांनी केली पाहणी
भुसावळ तालुका शिवसेना संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केली होती मागणी
भुसावळ : अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या ट्रामा सेंटरमध्ये कोविड उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी 10 जुलै रोजी, शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेत सोमवारी भुसावळात आलेल्या जिल्हाधिकार्यांनी ट्रॅामा केअर सेंटरला भेट देऊन आरोग्य व इतर यंत्रणेविषयक कामकाज तथा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी आमदार संजय सावकारे, उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलिस अधिक्षक गजानन राठोड, तहसीलदार दीपक धीववरे, डॉ.देवश्री घोषाल व मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांनी मागणीची घेतली दखल
मुबलक मनुष्यबळ व साधन सामुग्री असतांना सुद्धा भुसावळात फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व रेल्वे हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल केले जाताय, वसतिगृहात ऑक्सीजनची तोडकी व्यवस्था असून रेल्वे हॉस्पिटलमध्ये मोजक्याच सुविधा आहे. स्वतः कोरोना योध्या असलेल्या डॉक्टरांना व जवानांना सुविधा मिळाल्या नाही. बेड नसल्या कारणाने गोदावरीत रुग्ण अॅडमिट करा, असे सांगण्यात आले. लाखो रुपयांचा निधी खर्च करीत आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी ट्रामा सेंटर उभे राहिले तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटन केले, परंतु कोविडसारख्या आजारावर सुविधा असतांना सुद्धा उपचार सुरू झाले नाही. या केंद्राला मिळालेले 30 ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा वापरात आणू शकले नाही. हे ट्रामा सेंटर कोविड उपचार केंद्र म्हणून लवकर सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे केल्यानंतर सोमवारी त्यांनी पाहणी करण्यात आली.
कोरोना योद्ध्यांना आरामाची गरज
ट्रामा सेंटरला सुसज्ज करण्यासाठी योगदान दिलेल्या कर्मचार्यांना परत रुजू करून कोविड रुग्णालय सुरू व्हावे कारण भुसावळात इतर ठिकाणी असलेल्या सुविधा अपुर्या पडत आहेत. डॉक्टर, नर्स व पोलीस प्रशासनाच्या कर्मचार्यांना आरामाची गरज आहे. नागरीकांच्या पैश्यातून बनवलेल्या वास्तूचा उपयोग होत नसेल तर त्याचा फायदा नाही, जिल्हाधिकारी साहेबांनी यातून मार्ग काढावा ही अपेक्षा आहे, असे प्रा.धीरज पाटील यांनी कळविले आहे.

