वरणगावात भाजपातर्फे वाढीव वीज बिलांची होळी


वीज बिल माफ करा अन्यथा रस्त्यावर उतरणार : माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचा इशारा

भुसावळ : तालुक्यातील वरणगावसह परीसरात कोरोना या महामारीत सर्वसामान्य नागरीकांना वाढीव वीज बिल आले असून सर्वसामान्य नागरीकांना 20 हजारांहून अधिक वाढीव वीज बिले आल्याने नागरीक प्रचंड हैराण झालेले आहेत. वाढीव वीज बिल माफ करावे या मागणीसाठी वीज कंपनीच्या वरणगावातील कार्यालयासमोरच मंगळवारी वीज बिलाची होळी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा नेते सुनील माळी, हाजी अल्लाउद्दीन सेठ, शामराव धनगर, रमेश पालवे, हितेश चौधरी, विवेक शिवरामे, शंकर पवार, संजय सोनार, डी.के.खाटीक, गोलू राणे, नटराज चौधरी, आकाश निमकर, किरण वंजारी, अतुल बावणे, राहुल जंजाळे, अनिकेत चांदखेडकर, राकेश लोहार, जय चांदणे, अनिल कुसूमंबे यांच्या सह असंख्य नागरीक उपस्थित होते.

तर रस्त्यावर उतरणार : सुनील काळे
माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, वरणगाव शहरासह परीसरातील नागरीकांना आलेले वाढीव वीज बिल माफ करावे, वारंवार अवेळी खंडित होणारा वीजपुरवठा थांबवावा, वीज कंपनी कार्यालयात फोनवर कायम कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात यावी तसेच रेल्वे स्टेशन ते बस स्थानकचौका डीपीडीसी अंतर्गत 35 लाख रुपयांचे वीज पोल शिप्टींगचे काम मंजूर असून ते करण्यात यावे, शेतकर्‍यांच्या शेतातील वीज तार कापून चोरी होत असल्याने त्याबाबत दखल घेवून नवीन तार टाकण्यात यावेत, नागेश्‍वरी ते पाणीपुरवठा योजनेपर्यंत डीपीडीसी योजनेतून वीज पोल टाकलेले असून ते काढू नये आणि बंद केलेला वीजपुरवठा सुरू करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !