जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण पोहोचले 61 टक्क्यांवर


जिल्ह्यात सध्या 2163 क्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू : जिल्ह्याचा कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्युदर 5.36 पर्यंत कमी करण्यात प्रशासनाला यश

जळगाव : जिल्ह्यात आढळून आलेल्या 6393 कोरोनाबाधीत रुग्णांपैकी आज दिवसभरात (14 जुलै रोजी) 147 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत तीन हजार 887 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 60.80 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

मृत्युदर हा 5.36 टक्यांपर्यत खाली आणण्यात यश
जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात गेल्या काही दिवसात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रूग्णांचे प्रमाण वाढण्याबरोबरच जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्युदर हा 5.36 टक्यांपर्यत खाली आणण्यास प्रशासनास यश आले आहे. याबाबत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा व पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणेसह सर्व कोरोना योध्दांचेही कौतुक केले आहे. कोरोनावर मात केलेल्या रूग्णांमध्ये तीन महिन्याच्या बालिकेपासून 92 वर्षीय आजीच्या तर समावेश आहेच. शिवाय विविध व्याधी व जुने आजार असलेल्या रुग्णांसह अनेक कोरोना योध्दांचाही समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 32757 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत 32 हजार 757 कोरोना संशयीत व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी 24 हजार 797 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सहा हजार 393 अहवाल आले पॉझीटीव्ह आले आहे. शिवाय इतर अहवालाची संख्या 396 असून अद्याप 1171 अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात संशयित म्हणून तपासणी करण्यात आलेल्या 32757 व्यक्तींपैंकी 6393 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा दर हा 19.51 इतका आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या
जळगाव शहर- 831, जळगाव ग्रामीण- 121, भुसावळ- 402, अमळनेर- 356, चोपडा-284, पाचोरा-89, भडगाव- 262, धरणगाव- 159, यावल -278, एरंडोल- 194, जामनेर-118, रावेर-250, पारोळा- 267, चाळीसगाव- 73, मुकताईनगर -83, बोदवड -112, इतर जिल्ह्यातील- 8 याप्रमाणे एकूण 3887 रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या दोन हजार 163 अ‍ॅक्टीव्ह रुगण
जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले दोन हजार 163 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 1549, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 127, तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये 487 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये जळगाव शहर 676, जळगाव ग्रामीण 158, भुसावळ 127, अमळनेर 102, चोपडा 122, पाचोरा 38, भडगाव 10, धरणगाव 106, यावल 25, एरंडोल 104, जामनेर 225, रावेर 159, पारोळा 59, चाळीसगाव 71, मुक्ताईनगर 98, बोदवड 72, दुसर्‍या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 11 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील आढळून आले 6393 कोरोनाबाधीत रुग्ण
जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 6393 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 1570, जळगाव ग्रामीण 298, भुसावळ 581, अमळनेर 488, चोपडा 429, पाचोरा 138, भडगाव 280, धरणगाव 284, यावल 326, एरंडोल 309, जामनेर 365, रावेर 441, पारोळा 333, चाळीसगाव 157, मुक्ताईनगर 185, बोदवड 190, दुसर्‍या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 19 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 1276 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 1276 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 462, शहरी भागातील 464 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 350 ठिकाणांचा समावेश आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !