हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले
भुसावळ : हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आले आहेत. बुधवारी दुपारी चार वाजता धरणाचे 24 दरवाजे पूर्ण क्षमतेने तर 12 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. दुपारी चार वाजेच्या सुमारास धरणात 209.580 मीटर जलसाठा शिल्लक होता तर प्रति सेकंद 1957 क्यूसेस तर 69 हजार 121 क्सूसेस पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

