चोरी झालेल्या त्या कुटूंबास आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली मदत
बोदवड : शहरातील बाळासाहेब ठाकरे नगरातील रहिवासी अरुण भोई यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यात चोरट्यांनी घरातील कपडे, संसारोपयोगी वस्तू, अंथरुण व तीन हजार रुपये लंपास केले होते. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये रोजगार गमवून आधिच खिसे रिकामे झालेल्या अरुण भोई यांच्यावर संकट कोसळले होते. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांकडून आमदार चंद्रकांत पाटील यांना कळविला असता त्यांच्याकडून 10 हजार रुपये रोख रक्कम व किराणा साहित्याची मदत करण्यात आली. संकटाच्या काळात मदत मिळाल्याने अरुण भोई यांचे डोळे पाणावले व त्यांनी आमदारांचे त्यांनी आभार मारले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटिल, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, तालुकाप्रमुख गजानन खोडके, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख मेहबूब, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, दीपक माळी, सुभाष देवकर, पिंटू पाटील, विनोद मायकर , अमोल व्यवहारे व इतर जण उपस्थित होते.

