धक्कादायक ! : भुसावळात एसआरपीएफच्या 34 जवानांना कोरोनाची बाधा


भुसावळ शहरासह तालुक्यात एकाच दिवशी आढळले 44 पॉझीटीव्ह

भुसावळ : शहरासह तालुक्यात कोरोनाचा फैलाव कायम असून गुरुवारी दिवसभरात व रात्री आलेल्या अहवालात तब्बल 58 पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली. विशेष म्हणजे बाधीतांमध्ये 34 एसआरपीएफ जवांनासह शहरातील विविध भागातील 13 रुग्णांसह भुसावळ तालुक्यातील 11 रुग्णांचा समावेश आहे.

शहरात या भागात आढळले बाधीत रुग्ण
गुरुवारी शहरासह तालुक्यात एकाच दिवसांत 58 जण पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले. यात एसआरपीएफच्या34 जवानांचा तर शहरातील विविध भागांतील 13 रुग्णांचा समावेश आहे तर अन्य रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. बाधीतांमध्ये शहरातील रामायण नगरातील 32 वर्षीय पुरुष, न्यू सतारा भागातील 50 वर्षीय पुरुष, गरुड प्लॉटमधील अनुक्रमे 40 व 12 वर्षीय पुरुष, 15 बंगला भागातील 29 वर्षीय महिला, गोदावरी नगरातील एकाच कुटूंबातील चार, गोकूळ नगरातील 21 वर्षीय पुरुष, दत्त नगरातील 49 वर्षीय महिला, मामाजी टॉकीज रोड परीसरातील 65 वर्षीय पुरुष असे रुग्ण गुरुवारी आढळले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !