तरुणीचा अश्‍लील व्हिडिओ बनवणारा जाळ्यात


जळगाव : तरुणीचा अश्‍लील व्हिडिओ बनवणार्‍यास अटक करण्यात आली. आसीफ बेग असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रुणी तिची आई तसेच भावासह वास्तव्यास आहे. त्याच्या घराशेजारी असलेल्या रहिवाशाचे बांधकाम सुरु आहे. सिमेंट वगैरे साहित्य ठेवण्यासाठी तरुणीच्या आईने बांधकाम कामगारांना खोली दिली असून 17 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास 22 वर्षीय तरुणी घरात एकटीच असताना घरात बांधकाम कामगार तरुण आला. त्याने तरुणीला मेमरी कार्ड दिले. तसेच त्यात तरुणीचे काही व्हिडीओ असल्याचे त्याने सांगितले. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार आईला न कळविता हा प्रकार फोनवरुन तिच्या शेजारच्यांना कळविला, शेजारचे आले व त्यांनी तरुणीला संबंधित मेमरी कार्डमधील व्हिडीओ तिच्या लॅपटॉपमध्ये तपासण्यास सांगितले असता, यात तरुणीचा एक मिनिटाचा व्हिडीओ तयार केला असल्याचे दिसून आले. यानंतर तरुणीने या प्रकाराबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तरुणीच्या घरी पोहचले. मेमरी कार्ड देणार्‍या आतीफ याकूब बेग (20, रा.आझादनगर, पिंप्राळा हुडको) याची चौकशी केली असता त्यानेच तरुणीचा व्हिडीओ बनविला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तरुणीच्या फिर्यादीवरुन आसिफ याकूब बेग या तरुणाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या माहितीनुसार पोलिस कॉन्स्टेबल, मुकेश पाटील, हेमंत कडकर, चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर, शांताराम पाटील या कर्मचार्‍यांनी संशयीत तरुण आसीफ बेग यास अटक केली आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय भोई करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !