शेळगाव बॅरेजचे महाराणा प्रतापसिंह महासागर नामकरण करावे
श्री राजपूत करणी सेनेची मागणी : तहसीलदारांना निवेदन
भुसावळ : यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज या प्रकल्पाला महापुरुष महाराणा प्रतापसिंह महासागर असे नाव देण्यात यावे, अशी मागणी शुक्रवारी तहसीलदार दीपक धिवरे यांना श्री राजपुत करणी सेनेचे तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, खान्देश विभाग सोशल मीडिया प्रमुख अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
कृउबा उपसभापती अशोक पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष समाधान महाजन, काँग्रेस नेते बंटीभैया पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण प्रशांतसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी खान्देश उपाध्यक्ष किरण पाटील, तालुका उपप्रमुख चरणसिंग चौधरी भूषण जेथवे, शहर प्रमुख गोपी राजपूत व पदाधिकारी उपस्थित होते. सरकारी नियमानुसार सोशल डिस्टसिंग व मास्क लावून नियमाचे पालन करण्यात आले.
आमच्या राजपूत समाजचे घरे व शेती गेली : हर्षल पाटील
यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज या प्रकल्पासाठी आमच्या राजपूत समाजाने त्यांच्या घरे व जमिनी दिल्या आहे व त्यांचे पुनर्वसन सुध्दा वरच्या गावात झाले आहे. आजही आमचा राजपूत समाज विकासापासून वंचित आहे व अनेक सुख-सुविधांपासून वंचित आहे. शेळगाव बॅरेजसाठी राजपूत समाजाचे मोठे योगदान आहे. या योगदानाला स्मरून त्या प्रकल्पाला हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांचे नाव द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार दीपक धीवरे यांना करण्यात आली असल्याचे हर्षल पाटील यांनी कळवले आहे. लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जलसंपदा मंत्री यांना देखील निवेदन देण्यात येईल, असे त्यांनी कळवले आहे.

