भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी प्रभागात केला झगमगाट


स्व-खर्चातून हायमास्टची दुरुस्ती केल्याने नागरीकांनी व्यक्त केले समाधान

भुसावळ ः सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी पालिकेच्या कारभारावर विसंबून न राहता गंगाराम प्लॉट भागात बसवण्यात आलेल्या हायमास्टचे लाईट बदलवून नागरीकांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हायमास्ट बंद असल्याने नागरीकांची मोठी गैरसोय होत असल्याची दखल घेवून सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी स्वखर्चातून हायमास्टचे लाईट बदलले आहेत.

सामाजिक कार्यात नितीन धांडे अग्रेसर
आपल्या प्रभागात कुठेही गरज पडल्यास पदरमोड करून स्वखर्चाने कामे करण्यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे हे नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यापूर्वी नगरपरीषदेने दिलेले मोठे वृक्ष धांडे दाम्प्त्याने जतन करूनही जगू न शकल्याने वृक्षारोपण करण्यात आलेली झाडे काढून पुन्हा त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांनी स्व:खर्चाने प्रभागात वृक्षारोपण केले. यंदाच्या पावसाळ्यात वृक्षारोपणाचे कार्य धांडे यांनी हाती घेतले आहे. दरम्यान, दोन वर्षांपासून गंगाराम प्लॉटमधील हायमास्ट लाईट बंद असल्याने त्यांनी वारंवार नगरपरीषदेकडे पाठपुरावा केला होता मात्र दखल घेतली जात नसल्याने स्वखर्चाने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी नवीन हायमास्ट लावत या परीसरात झगमगाट केल्याने प्रभागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !