दहिवदच्या लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान


अमळनेर : अमळनेर शहरातील युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे दहिगाव येथील लोकनियुक्त सरपंच सुषमाताई वासुदेव पाटील यांनी कोरोना संक्रमण प्रतिबंध कामी गावात केलेल्या प्रभावी कामाची व अथक परीश्रमाची दखल घेत त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला. युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, भागवत यांनी स्वतः दहिवद गावी जावून सरपंच सुषमा पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सेवाभाव सन्मान पत्र देवून गौरव केला

गावात विकासाचे काम अविरत करणार : सुषमा पाटील
गौरवप्रसंगी सुषमा पाटील म्हणाल्या की, त्यांना मिळालेला सन्मान हा दहिवद गावातील प्रत्येक नागरीकांचे सहकार्य व योगदानाचे प्रतीक म्हणून मी स्विकारते व भविष्यात ही ग्रामस्थांचे आशिर्वाद व सहकार्याने गाव व परीसर विकासाचे काम अविरतपणे करीत राहणार आहे. आधार पाटील, माजी सरपंच जयवंत पाटील, शिवाजी पारधी, सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नीळकंठ पाटील, जयश्री पाटील, श्रद्धा पाटील, आरोग्य सेविका पडाळे, कोतवाल, आशा सेविका तसेच कोरोना प्रतिबंधक पथक सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !