सावद्यात पाच तालुक्यांसाठी खतांचा‘रॅक पॉईंट’ उपलब्ध
सावदा : रावेर, मुक्ताईनगरसह पाच तालुक्यांना खते घेतांना जळगाव येथून वाहतुकीसाठी लागणारा अतिरीक्त खर्च व्यापारी व शेतकरी यांना जास्तीचा भरावा लागत होता, याच बाबत एक आढावा बैठक 18 रोजी मुक्ताईनगर येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता तत्त्काळ गुलाबराव पाटील यांनी यावर निर्णय घेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना सूचना करीत खतांचा रॅक पॉइंट, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, यावल, या पाच तालुक्यांसाठी सावदा येथे रेल्वे स्टेशनवर थांबविण्याचे सांगितले, त्यानुसार सावदा येथे लवकरच खतांचे रॅक पॉइंट होऊन येथे खते उतरणार असल्याने शेतकरी व व्यापारी यांना सुविधा उपलब्ध होऊन येथील समस्या सुटणार आहे. शेतकरी व व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

