शेतकर्‍यांसाठी खतांचा तुटवडा जाणवणार नाही


आमदार चंद्रकांत पाटील यांनी खत विक्रेत्यांच्या बैठकीत घेतला आढावा

मुक्ताईनगर : आवश्यक परिस्थितीत विविध आवश्यक ती खते, मिश्र खते, युरीया इ. खते आवश्यकतेनुसार मिळत नसल्याचे अनेक शेतकर्‍यांनी आ.चंद्रकांत पाटील यांचे निदर्शनास आणून दिले असता 18 रोजी आ.पाटील यांनी मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील कृषी खत विक्रेत्यांची आढावा बैठक घेवून आवश्यकतेनुसार खते उपलब्ध होतांना येत असलेल्या विविध अडचणी जाणून घेतल्या.

या मागण्यांबाबत झाली चर्चा
या बैठकीत आ.पाटील यांनी खतांसबंधीत शेतकर्‍यांना येत असलेल्या विविध अडचणी व वितरकांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी खालील विषयांवर चर्चा झाली त्यात लिंकींगचीसक्ती नको- कंपन्यांनी माल देतांना दुकानदारांना लिंकींगची सक्ती करु नये. आवश्यकतेनुसार/मागणी नुसार दुकानदारांना खते मिळावी- खतांबाबत दुकानदारांकडून जळगाव येथे ऑर्डर स्विकारली जाते परंतु आवश्यकतेनुसार माल उपलब्ध होत नाहीत म्हणून मागणी नुसार खते उपलब्ध व्हावीत. माल पोच मिळावा-खते वाहतुकीस पोहोच माल उपलब्ध होत नाहीत तसेच पोहोच मालाला अतिरिक्त चार्ज लावला असता वितरकांना विक्री करणे परवडत नाहीत म्हणून माल पोहोच मिळावा. सावदा येथे रॅक पॉईंट वाढवून मिळावा- मुक्ताईनगर, रावेर व बोदवड या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर केळी व कापुस पिक मोठ्या प्रमाणात पिकत असल्याने सावदा येथे रॅक पॉईंट वाढवून मिळावा यामुळे खते वाहतुक करतांना येणार्‍या अडचणी देखील सोडविल्या जातील. मुक्ताईनगर तालुक्यातील 350 मॅट्रीक टन खते इतरत्र वळविला गेल्याने तसेच 60 हजार टन माल कमी उपलब्ध झाल्याने तात्काळ उपलब्ध करून मिळावा. मागणी व्यतिरीक्त इतर खतांची सक्ती नको- मागणी असलेल्या खतांचीच कंपनीने पुरवठा करावा विनाकारण सोबत इतर खते घ्यावीच लागतील अशी सक्ती नसावी आदी मागण्यांचा समावेश होता.

यांची होती उपस्थिती
या बैठकीस विनोद तराळ, यु.डी.पाटील, प्रभाकर पाटील, अनंतराव देशमुख, ईश्वर रहाणे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटु भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल पाटील, कृषी वितरक संघटनेचे तालुका अध्यक्ष धिरज जैन, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, गोपाळ सोनवणे, शुभम शर्मा, दिपक पवार, प्रफुल्ल पाटील, स्विय सहायक प्रविण चौधरी व संतोष कोळी, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील कृषी खत विक्रेत्यांची उपस्थिती होती.

आजसारखी परिस्थिती भविष्यात उद्भवणार नाही : आ.पाटील
शेतकर्‍यांना व वितरकांना खतांसदार्भात येत असलेल्या अडचणींचा पाठपुरावा तात्काळ जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व कृषीमंत्री दादा भुसे यांचेकडे करुन अडचणी सोडविल्या जाव्यात यासाठी आजची ही बैठक बोलावली होती. कालच पालकमंत्री व कृषीमंत्री यांचेशी याबाबत चर्चा झाली. त्यांनी खतांच्या मागणी संदर्भात माहीती मागवली असून संध्याकाळी यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन व तसे पत्र कृषी मंत्री दादा भुसे व पालकमंत्र्यांना देवून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही असे या बैठकीत आ.पाटील यांनी सांगितले.कृषी खतांसदार्भात येत असलेल्या अडचणींविषयी आ. पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना तसे पत्र देवून व राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची संध्याकाळी भेट घेवून तसे लेखी पत्र दिले असुन तात्काळ खते उपलब्ध होणार असल्याचे तसेच इतरही समस्या सोडविल्या जाणारं असल्याचे आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !