जळगावातील बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला
तरुणीचा खून झाल्याचा दावा : संशयीत तरुण चौकशीकामी ताब्यात
जळगाव : शहरातील 16 वर्षीय बेपत्ता असलेल्या तरुणीचा हात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह तांबापुरानजीकच्या खदानीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. रविवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा शोध सुरू असतानाच तिचा मृतदेह आढळल्याने मुलीचा खून करण्यात आल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयीत तरुणाला चौकशीकामी ताब्यात घेतले असल्याचे समजते. दरम्यान, मृत तरुणीची आई गणपती नगर परीसरात धुणे-भांड्याचे काम करते शिवाय रविवारी दुपारी तरुणी आपल्या आई-सोबत कामाला गेल्यानंतर मद्य प्राशन केलेल्या अवस्थेतील एका तरुणाने या तरुणीने दुचाकीवर बसवून नेल्याची माहिती आहे.

