मराठा आरक्षण : 1 सप्टेंबरला होणार सुनावणी
नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आता 1 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. राज्य सरकारला आणखी दीड महिनाभराचा वेळ मिळाला आहे. वेगवेगळी कागदपत्र सादर करणं हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अवघड असल्याने सुनावणी प्रत्यक्ष व्हावी, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील पटवालिया यांनी राज्य सरकारच्या वतीने केला. शिवाय मुकुल रोहतगी यांनीही हीच बाब नमूद केली. कोरोना संकटामुळे सध्या नोकर भरती होत नाही त्यामुळे हे प्रकरण तातडीने घेण्याची गरज नाही, राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टाला सांगण्यात आलं.
25 ऑगस्ट रोजी विशेष सुनावणी
मराठा आरक्षणाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे द्यावं या मागणीवर विचार करण्यासाठी सुप्रीम कोर्ट तयार आहे. त्याबाबत 25 ऑगस्ट रोजी विशेष सुनावणी होणार आहे.

