बाबरी मशीद प्रकरण : सर्व आरोपींची निर्दोष सुटका


बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नाही : लखनौ न्यायालयाचा निर्वाळा

अयोध्या : बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला असून या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हणत या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता केली आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याचा बुधवारी निकाल जाहीर करण्यात आला.

26 आरोपी न्यायालयात उपस्थित
न्यायाधीश एस. के. यादव यांच्या न्यायालयात लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सहा जण गैरहजर राहिले तर उर्वरीत 26 आरोपी न्यायालयात उपस्थित होते. अनुपस्थित आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आला.



या आरोपींची निर्दोष मुक्तता
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर या संशयीत आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !