भुसावळातील दुचाकी चोरटे बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
डीबी शाखेची कामगिरी : चोरलेल्या दोन दुचाकी जप्त
भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. भिकन देवा कानोडे (21, रा.भारत नगर) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत अन्य एका 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीसही ताब्यात घेण्यात आले आले. दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
चोरलेल्या दोन दुचाकी जपत
21 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील आई हॉस्पिटलकडे अॅक्टीव्हा दुचाकी लावली असताना ती चोरट्याने लांबवली होती. या प्रकरणी रमजान हमीदउल्ला शेख (55, रा.भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार 24 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ पोलिस निरीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर आरोपी भिकन कानोडे व अल्पवयीन संशयीतास ताब्यात घेण्यात आले होते. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास ापोलिस कोठडी सुनावण्यात आली व चौकशीदरम्यान त्याने दोन दुचाकी चोरल्याची कबुली देत वाहने काढून दिली. त्यात 20 हजार रुपये किंमतीची अॅक्टीव्हा व 35 हजार रुपये किंमतीच्या अॅक्टीव्हा गाडीचा समावेश आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, मंगेश गोंटला, एएसआय तस्लिम पठाण, हवालदार इरफान काझी, अयाज सैय्यद, नाईक रवींद्र बिर्हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे, योगेश महाजन, सुभाष साबळे, सचिन चौधरी आदींनी केली.

